Pune | Thu, 16 July 2026

Ad

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम

Sunil Goyal | 10 views
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम

मुंबई दि. १५: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

२२ जुलै रोजी जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

​परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल.

हा आदेश राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश साप्रविच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp