Pune | Tue, 17 March 2026

Ad

दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

Sunil Goyal | 9 views
दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

मुंबई, दि. 24 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर, सावरकर नगर, ठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी या कालावधीत सायंकाळी 6:30 वाजता, ठाणे  येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे.

महाराष्ट्र दशावतार लोककला ही कोकणाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दशावतार लोककला ही कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख लोककला आहे. ही कला भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे आणि ती पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर केली जातात.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध दशावतार मंडळांचे सादरीकरण करणारे 100 हून अधिक कलाकार एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री कलेश्वर ‘दशावतार’ नाट्य मंडळ, अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळ, खानोली  आणि सिध्दीविनायक दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली यांसारख्या पारंपरिक लोककलांचे जिवंत दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती जतन करणे आणि या दुर्मीळ होत चाललेल्या लोककलांना ऊर्जितावस्था देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp