Pune | Wed, 18 February 2026

Ad

गोसीखुर्द प्रकल्पातील पुनर्वसनाची कामे गतीने करा – मंत्री मकरंद जाधव-पाटील

Sunil Goyal | 3 views
गोसीखुर्द प्रकल्पातील पुनर्वसनाची कामे गतीने करा – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई,दि.१८:  पेंच प्रकल्पातील पाणीटंचाई संदर्भातील कामे,गोसीखुर्द प्रकल्पाची पुनर्वसनाची कामे गतीने करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी केल्या.

मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत नागपूर व अमरावती प्रादेशिक विभागातील मदत व पुनर्वसन विभागाकडील प्रलंबित कामांबाबत बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, पेंच खो-यामध्ये पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात चिंचोली, हिंगणा व काटा खमारी उपसा सिंचन योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर महसूल विभागाकडून निधी देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

महसूल, मदत व पुनर्वसन विभागाने ही कार्यवाही समन्वयातून करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गोसीखुर्द पुनर्वसन प्रकल्पातील नागरी सुविधा अपूर्ण असलेल्या कामांची सद्यस्थितीबाबतही  बैठकीत चर्चा करण्यात आली.

०००

संध्या गरवारे /विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp