मुंबई, दि. ३० : जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोजी यांनी मंत्री जयकुमार रावल यांना ‘जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स’च्या बोटीवरील ‘इंडो-पॅसिफिक डिप्लॉयमेंट – २०२५’ अंतर्गत होणाऱ्या स्वागत समारंभाचे निमंत्रण दिले.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मित्रदेश व भागीदार राष्ट्रांच्या नौदलांसोबत सरावाद्वारे सहकार्य अधिक बळकट करणे तसेच प्रदेशातील शांतता व स्थैर्याला हातभार लावणे आणि भागीदार नौदलांशी परस्पर सहकार्य वाढवणे या उद्देशाने ‘जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स’ कडून ‘इंडो-पॅसिफिक डिप्लॉयमेंट २०२५’ ची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत ११ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असून यागी कोजी यांनी मंत्री रावल यांना या समारंभासाठी निमंत्रित केले.
या भेटीदरम्यान मंत्री रावल यांनी कोजी यांना राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांचे स्वागत असल्याचे सांगितले. राज्य शासनामार्फत यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचेही ते म्हणाले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/