Pune | Mon, 16 February 2026

Ad

सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वे जयंती वर्ष; सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमास प्रतिसाद

Sunil Goyal | 1 views
सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वे जयंती वर्ष; सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमास प्रतिसाद

मुंबई, दि. १६ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महनीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाची आठवण करून देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp