Pune | Fri, 10 October 2025

Ad

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी ‘श्रीं’चे दर्शन – महासंवाद

Sunil Goyal | 9 views
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी ‘श्रीं’चे दर्शन – महासंवाद




मुंबई, दि. ३०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००







आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp