Pune | Tue, 17 February 2026

Ad

लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

Sunil Goyal | 16 views
लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १३ :  लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

सभापती प्रा. राम  शिंदे यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव विधानपरिषदेत मांडला.

दिवंगत पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत नगराध्यक्ष, उपमंत्री, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि पंजाब राज्याचे राज्यपाल अशा पदांची जबाबदारी पार पाडली असल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp