Pune | Tue, 17 February 2026

Ad

लोकसेवेचा नवा आदर्श घडविणारे व्यक्तिमत्त्व हरपले – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची शोकसंवेदना

Sunil Goyal | 29 views
लोकसेवेचा नवा आदर्श घडविणारे व्यक्तिमत्त्व हरपले – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची शोकसंवेदना

नागपूर, दि.१२:  लोकसभेचे माजी अध्यक्ष तसेच देशाचे माजी गृहमंत्री  शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि सांस्कृतिक मूल्य जपणारे व्यक्तिमत्त्व कायमचे हरपले, अशी शोकसंवेदना  क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री कोकाटे शोकसंदेशात म्हणतात, राजकारण आणि समाजकारणात नैतिकता, सभ्यता आणि संवादशीलता जपणाऱ्या एका नेतृत्वाला देश मुकला आहे. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशा अनेक पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत संयत, शांत, समन्वयी आणि कर्तव्यनिष्ठ वृत्तीने निभावल्या अशा शब्दांत त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

0000

श्रध्दा मेश्राम/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp