Pune | Mon, 16 February 2026

Ad

मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणूक आयुक्तांकडून वाखाणणी

Sunil Goyal | 13 views
मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणूक आयुक्तांकडून वाखाणणी

छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमांची आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पाहणी केली व या उपक्रमांची वाखाणणी करुन जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी भेट दिली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षा ठाकुर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सुर्या कृष्णमुर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड, तहसिलदार दिनेश झांपले आदी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवण्यात आली. त्यानंतर हा रथ रवाना करण्यात आला. त्यानंतर श्री. वाघमारे यांच्या समोर मतदार जनजागृती पोवाडा, पोतराज व गोंधळ सादर करण्यात आला. तसेच मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार सामुग्रीचे त्यांनी अवलोकन केले.

यासर्व उपक्रमांबद्दल श्री. वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती होऊन त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करावे व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp