Pune | Tue, 17 February 2026

Ad

मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेसाठी उद्या जनसंवाद बैठक

Sunil Goyal | 16 views
मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेसाठी उद्या जनसंवाद बैठक

नागपूर, दि. १३ :  कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने’साठी जनसंवाद बैठकीचे आयोजन उद्या १४ डिसेंबर रोजी सकाळी 11.15 वाजता जिल्हा नियोजन भवन, सदर नागपूर येथे करण्यात येणार आहे. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विविध भागधारकांशी संवाद साधून स्वयंरोजगार, उद्योग स्थापना, नाविन्यता आणि स्थानिक स्टार्टअप परिसंस्थेच्या बळकटीकरणाबाबत मार्गदर्शन व दिशा देणे तसेच राज्याच्या आगामी शासन योजनांबाबत, स्टार्टअप आणि नाविन्यता धोरणाबाबत मार्गदर्शन करणे आहे.

 या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक, इन्क्युबेशन सेंटर प्रतिनिधी, स्टार्टअप प्रतिनिधी, उद्योग संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व महामंडळ, महाविद्यालयांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता या कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५३१२१३ संपर्क करण्याचे  कळविले आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp