Pune | Sun, 15 February 2026

Ad

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन

Sunil Goyal | 8 views
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन

मुंबई, दि. 26 :  भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई शहर, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय सोहळ्यात ध्वजवंदन केले.

यावेळी आमदार चित्रा वाघ, नगरसेवक रोहिदास लोखंडे, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त्त जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने लीडर मनोहर पांडूरंग राणे यांच्या वीर पत्नी श्रीमती माधवी राणे यांना शाल व श्रीफळ देऊन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आणिबाणी काळात कारावास भोगलेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बालविवाह रोखण्याबाबत शपथ घेण्यात आली.

000

सुनील डहाळे/उपसंपादक

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp