
मुंबई, दि. 26 : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 77 व्या प्रजासत्ताक दिनी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य, मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, स्वातंत्र्य सैनिक, शहीद कुटूंबियांचे नातेवाईक व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मास्को येथील वर्ल्ड पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये सरीता संजय कदम यांनी बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि स्कॉट या खेळामध्ये २ गोल्ड मेडल्स व १ सिल्वर मेडल जिंकल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट खेळाडू यांचा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सामाजिक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेतील विजयी मंडळांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
00000
