Pune | Thu, 16 July 2026

Ad

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ६२० क्युसेक्स विसर्ग

Sunil Goyal | 10 views
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ६२० क्युसेक्स विसर्ग

अहिल्यानगर, दि. ०८ :नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी ९ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

आज सकाळी बंधाऱ्यातून ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सकाळी ९ वाजता त्यामध्ये वाढ करून विसर्ग १२ हजार ६२० क्युसेक्स करण्यात आला आहे.

पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp