Pune | Sun, 15 February 2026

Ad

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

Sunil Goyal | 9 views
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

नाशिक, दि. २६ (जिमाका) : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे, महेश जमदाडे, अभिजित नाईक, शुभांगी भारदे, सीमा अहिरे, कुंदन हिरे, तहसीलदार पंकज पवार, अमोल निकम, आबासाहेब तांबे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp