
मुंबई, दि. १८: राज्यात विविध ठिकाणी प्राचीन महानुभवीय तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांची माहिती संकलित करुन अधिकार अभिलेखामध्ये त्यांच्या नोंदी घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महानुभव स्थान महात्म्य अभियान, नागपूरचे समन्वयक हरिहर पांडे यांनी शासनास केलेल्या विनंतीनुसार महानुभाव तीर्थस्थानांबाबतची माहिती विहित विवरणपत्रात शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
विविध जिल्ह्यांमध्ये असलेले महानुभवीय तीर्थक्षेत्र शासकीय, खासगी, वन, ग्रामपंचायत अशा विविध जागांवर असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत देण्यात आली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी आवश्यकतेनुसार उपलब्ध असलेले दस्त तपासून त्यांच्या नोंदी घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ
