Pune | Sun, 15 February 2026

Ad

प्रजासत्ताक दिनी लोकभवन येथे ध्वजवंदन

Sunil Goyal | 7 views
प्रजासत्ताक दिनी लोकभवन येथे ध्वजवंदन

मुंबई दि. 26: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकभवन येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना दिली.

राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले.  विक्रम कुमार व अन्य अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश खालील लिंक वरुन पाहता येईल.

https://www.youtube.com/live/Q-ZJbdHgGIY

 

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp