Pune | Mon, 16 February 2026

Ad

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Sunil Goyal | 11 views
राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अटल पराक्रमाचा आणि आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून केलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या योगदानाचा तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीचा, मराठी माणसाच्या हक्कांसाठी केलेल्या लढ्याचा सर्वांना परिचय करून दिला.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp