Pune | Wed, 18 February 2026

Ad

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम

Sunil Goyal | 23 views
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम

मुंबई, दि.२० :- केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांनी घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०२५ चा निकाल ११ नोव्हेंबर २०२५ घोषित झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी) मुंबई येथे अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसेच क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ पूर्वी siac.cet2025@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विद्यार्थ्यांनी मुलाखत कार्यक्रम नोंदणीकरिता www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनेचे अवलोकन करावे. तसेच ०२२-२२०७०९४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम तसेच निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

गजानन पाटील/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp