
मुंबई, दि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नी ब्रिजिट यांच्यासह रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निरोप दिला.





