Pune | Sun, 15 February 2026

Ad

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधान भवनात आदरांजली

Sunil Goyal | 12 views
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे व सचिव-३ डॉ.विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव विजय कोमटवार, स्वाती ताडफळे, अवर सचिव सुरेश मोगल, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

0000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp