Pune | Fri, 10 October 2025

Ad

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे  मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन

Sunil Goyal | 9 views
सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे  मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. ०२ : ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दिक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परीसरात लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट व खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या  हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी नागपूर यांच्याद्वारे आयोजित समता रॅली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लावण्यात आलेल्या नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

माहिती पुस्तके, बुकलेट, घडी पुस्तिका आदीद्वारे सर्वसामान्य जनतेला माहिती पोहोचविण्याचे काम या स्टॉलद्वारे करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी,  चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखडे,  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी,  आशा कवाडे,  जिल्हा परीषदेचे  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती आदी उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp