
मुंबई दि. १३ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदा प्रथमच बँड महोत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ॲम्फिथिएटर, बँड स्टॅन्ड वांद्रे पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.
या बॅन्ड महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध बॅन्ड पथक सहभागी होणार असून हा आगळावेगळा बॅन्ड महोत्सव प्रथमच शासनाच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई व पुणे पोलीस बॅन्ड पथकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. १४ मार्च रोजी मुंबई पोलीस बॅन्ड, झंकार ब्रास बॅन्ड, किल्ले मच्छिंद्रगड सांगली, मास्टर रफी ब्रास बॅन्ड, जळगाव यांचे सादरीकरण होणार आहे तर रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ पुणे पोलीस बॅन्ड, पुणे, बाबुलाल ब्रास बॅन्ड, नासिक, जनता बॅन्ड पाटोदा, बीड, दर्यावर्दी ब्रास बॅन्ड, मुळेखंड कोळीवाडा, रायगड तर समारोपाच्या दिवशी सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६, पाईप बॅन्ड पुणे – (एसआरपी), वेस्ट बॅन्ड, मुंबई, अमर बॅन्ड, बारामती, पुणे या बॅन्ड पथकाचे सादरीकरण होणार आहे
बॅन्ड महोत्सवाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या महोत्सवाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे
सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
बॅन्ड महोत्सवाला व्यासपीठ देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हाच या भव्य महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
000
संजय ओरके/विसंअ
