Pune | Mon, 16 February 2026

Ad

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Sunil Goyal | 1 views
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि.१६ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महवीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारताचे पहिले उपप्रधानमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाची आठवण करून देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp