Pune | Sun, 15 February 2026

Ad

सेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाण

Sunil Goyal | 5 views
सेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. 08:  सेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम डॉ. पॅट्रिक हर्मिनी, राष्ट्रपती आणि सेशेल्स प्रजासत्ताकच्या प्रथम महिला श्रीमती व्हेरॉनिक हमिनी यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळी ११.५० वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा रोहित रथिश, भारताचे सेशेल्स येथील हाई कमिशनर, परमजीत सिंह दहिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ राजेश गवांडे, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp