Pune | Thu, 09 October 2025

Ad

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन

Sunil Goyal | 10 views
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, ॲड. राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (२) मेघना तळेकर, सचिव (४) शिवदर्शन साठये, उपसभापती विधानपरिषद यांचे खासगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी अविनाश रणखांब, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव नागनाथ थिटे व उपसचिव विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

विधानभवन/ज.सं.अ.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp