Pune | Tue, 17 February 2026

Ad

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

Sunil Goyal | 14 views
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. १३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग निवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला.

प्रारंभी शिबिरप्रमुख प्रवीण पुरो यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सह शिबिरप्रमुख खंडूराज गायकवाड, संचालक (माहिती) (वृत्त/जनसंपर्क) गोविंद अहंकारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी नागरिकांच्या हितासाठी विविध योजनांची होत असलेली अंमलबजावणी, शासनाचे निर्णय, प्रयत्न, विधीमंडळातील जुन्या आठवणी अशा अनेक विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. सुयोग निवासस्थान इमारतीच्या सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp