Pune | Tue, 17 February 2026

Ad

वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना संचालक कार्यालयाकडून निरोप

Sunil Goyal | 25 views
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना संचालक कार्यालयाकडून निरोप

नागपूर, दि. १२ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना आज नागपूर-अमरावती माहिती संचालक कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सेवानिवृत्तीपूर्व निरोप देण्यात आला. 

गेल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री. अष्टपुत्रे ३१ डिसेंबर २०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. या औचित्याने नागपूर माहिती संचालक कार्यालयात अनौपचारिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. नागपूर-अमरावती विभागाचे माहिती  संचालक डॉ. गणेश मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होते.

एकूण सेवेपैकी जवळपास अर्धा कालावधी एकूण ६ मुख्यमंत्री आणि १ उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रभावीपणे कार्य करणारे श्री. अष्टपुत्रे यांच्यासोबत प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा माहिती अधिकारी व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यालयात वृत्त शाखेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. यावेळी अनुक्रमे वर्धा,अकोला आणि नागपूर जिल्ह्यांचे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, हर्षवर्धन पवार आणि विनोद रापतवार यांनी तसेच निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ.गणेश मुळे यांनी  हृद्य आठवणींच्या माध्यमातून श्री अष्टपुत्रे यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडले. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले तर सहायक संचालक पल्लवी धारव यांनी आभार मानले.

००००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp