Pune | Wed, 18 March 2026

Ad

‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Sunil Goyal | 3 views
‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १८ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुढीपाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटीचंड म्हणून साजरा केला जातो.

गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटीचंड तसेच संसर पाडवो निमित्तदेखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp