Pune | Thu, 19 February 2026

Ad

‘इंडिया एआय समिट २०२६: महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून प्रगत प्रशासनाचे सादरीकरण

Sunil Goyal | 3 views
‘इंडिया एआय समिट २०२६: महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून प्रगत प्रशासनाचे सादरीकरण

नवी दिल्ली, दि. १८: भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या एआय इन ॲक्शन  या फ्लॅगशिप पॅव्हेलियनद्वारे देश-विदेशातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ संकल्पना न मांडता प्रत्यक्ष प्रशासनात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर केल्यास अपेक्षित उद्दिष्टपूर्ती साधण्याचे उदाहरण महाराष्ट्राने या माध्यमातून सर्वांसमोर मांडले आहे.

माहिती तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंह, महाआयटी व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया एआय समिट २०२६ मधील महाराष्ट्राचा सहभाग तसेच प्रशासनातील विविध उपक्रम यांचे  स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि धोरणकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.महाराष्ट्राने डिजिटल इंडियाच्या ध्येयाला गती देत एआयचा वापर केवळ कल्पनेत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे.

महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये शेती, आरोग्य, सायबर सुरक्षा आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या एआय प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी हवामान, बाजारभाव आणि पीक सल्ल्यासाठी एआय-आधारित व्यासपीठ असणारे ​महाविस्तार  गुंतवणूदारांसाठी ‘सिंगल विंडो’ सुविधा आणि एआय चॅटबॉटद्वारे व्यवसाय सुलभीकरण करणारे ​मैत्री आणि उद्योग मित्र तसेच ​महाराष्ट्र सायबर आणि महाक्राइम ओएस हे गुन्हे तपासात मदत करणारे एआय टूलआणि फॉरेन्सिक विश्लेषण याबरोबरच वैद्यकीय प्रोटोकॉल आणि क्लिनिकल संदर्भांसाठी डॉक्टरांना मदत करणारे मार्व्हलज्युनियर डॉक्टर चॅटबॉट आणि विविध शासकीय विभागांमध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी ​महाजीपीटी या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा हा सहभाग राज्याला एआय तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर नेणारा ठरणार आहे.

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp