Pune | Tue, 04 August 2026

दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना मंत्री प्रताप सरनाईक यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Sunil Goyal | 3 views
दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना मंत्री प्रताप सरनाईक यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. समाजहिताची जाणीव ठेवून उभारलेला त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.”

“डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा