Pune | Tue, 04 August 2026

राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात  

Sunil Goyal | 15 views
राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात  

मुंबई, दि. ४ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन, मुंबई परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रेला सुरुवात झाली. राज्यपालांनी  मंदिरामध्ये जाऊन देवीची पूजा व आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, प्रभू श्री राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व इतर परिसरातील अनेक कोळी बांधवांनी देवीचे दर्शन घेतले.

राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले. लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी लोकभवन परिसरात ही एकदिवसीय यात्रा भरते.  पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

००००

आमच्यात सामील व्हा