Pune | Sun, 05 April 2026

Ad

१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ प्रथम

Sunil Goyal | 8 views
१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ प्रथम

मुंबई, दि. २९ मार्च : राज्य शासनाच्या १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या विशेष मोहिमेत राज्यातील इतर महामंडळांप्रमाणे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळानेही राज्यातील महामंडळांच्या वर्गवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व्यवस्थापकीय संचालक विजय मगन देवराज आणि त्यांच्या संपूर्ण चमूचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती, सरळसेवा भरती, बिंदुनामावली, अनुकंपा भरती, IGOT प्रशिक्षण आणि सेवापुस्तक या विविध घटकांच्या आधारे गुणांकन करण्यात आले.

000

राजू धोत्रे / वि.स.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp