मुंबई, दि. ०१ : मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी भेट दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये चर्म उत्पादने तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत तयार करण्यात आलेल्या शबरी नॅचरलची उत्पादने आहेत.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शबरी नॅचरल्सने आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ई-कॉमर्स आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जागतिक बाजारपेठेत आदिवासी उत्पादनांना वेगळी ओळख मिळत आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनांना नव्या बाजारपेठेत प्रवेश मिळत आहे.
शबरी नॅचरल्सच्या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळणे, ही एक अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
०००
शैलजा पाटील/विसंअ