Pune | Sun, 15 February 2026

Ad

अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करावा – मंत्री पंकजा मुंडे

Sunil Goyal | 3 views
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करावा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ११ : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून, येथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.
०००
किरण वाघ/विसंअ
आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp