Pune | Mon, 13 April 2026

Ad

बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक; मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Sunil Goyal | 1 views
बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक; मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई, दि.१३:  २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी  मतदान होणार आहे.  या मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

०००००

एकनाथ पोवार/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp