Pune | Sat, 11 April 2026

Ad

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

Sunil Goyal | 3 views
भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

अमरावती, दि. 10 (जिमाका): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले,नियोजित भूमापन मोजणीचा कालावधी कमी करून तो पंधरा दिवसांवर आणावा. त्यासाठी मोजणी साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आले आहे. यापूर्वी नियमित मोजणीसाठी 90 दिवस तसेच द्रुगतीसाठी 30 दिवस असा कालावधी होता. हा कालावधी कमी करण्यात यावा. जिल्ह्यात या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मनुष्यबळाची भरती करण्यात यावी. नगर भूमापनचे काम भू -नक्शा या प्रकल्पाखाली करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या स्तरावर जिल्ह्यातही प्रकल्प राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.

गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण, कुस्ती मॅट वितरण

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका) : गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी सन 1914 मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचे गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने नामफलकाचे लोकार्पण, तसेच कुस्ती मॅट वितरण सोहळा शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी पार पडला. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन, तसेच कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार प्रविण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.

प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे आणि आशीष हटेकर यांनी सूत्रसंचालन केले.

0000

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp