Pune | Sun, 05 April 2026

Ad

एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

Sunil Goyal | 7 views
एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

मुंबई दि.२८  – ‘वेलनेस आणि प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अचूक वेलनेसद्वारे अधिक लवकर आणि स्मार्ट प्रतिबंध’ या विषयावर वैद्यकीय परिषद २०२६ मध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर केल्यास अधिक प्रभावी, अचूक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विकसित होऊ शकते. तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञान यांच्या एकत्रित वापरावर भर दिला.

हॉलिस्टिक वेलनेसचे अध्यक्ष, संस्थापक व कोच डॉ. मिकी मेहता  यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. मानवी अंतर्ज्ञान आणि जैविक प्रणालींचे महत्त्व कायम राहणार असून AI ही फक्त सहाय्यक साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेल्थ इनोव्हेशन एक्स्चेंज चे सह-संस्थापक प्रदीप कक्कतील यांनी आरोग्य क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा आणि AI, वेअरेबल्स व डेटा-आधारित उपाययोजनांचा वेगाने होत असलेला विकास अधोरेखित केला. शासन खाजगी क्षेत्र, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन भांडवल व शाश्वत मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. केवळ नफा किंवा ‘युनिकॉर्न’ होण्यावर लक्ष केंद्रित न करता सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपाय विकसित करणे महत्त्वाचे आहे.

            हार्वर्ड मेडिकल स्कूल च्या शस्त्रक्रिया विषयातील व्याख्याता, कॅनोमिक्स इंक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व सह-संस्थापक डॉ लीना प्रधान यांनी आयुर्वेदिक वनस्पती आणि घटकांच्या वैज्ञानिक पडताळणीवर भर दिला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पतींचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जनुकीय (gene level) पातळीवर समजून घेणे आणि ग्राहकांना वैज्ञानिक माहिती देणे अत्यंत आवश्यक असे त्या म्हणाल्या.

एआर इंटरनॅशनल च्या संस्थापक डॉ. अलका मेहता  यांनी त्वचारोग क्षेत्रातील AI चा वापर स्पष्ट करताना भारतीय संदर्भातील मजबूत डेटा तयार करण्याची गरज व्यक्त केली. चुकीच्या निदानाचे धोके लक्षात घेता AI चा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे त्यांनी नमूद केले.

शुगरफिट चे सह-संस्थापक शिवतोष कुमार  यांनी लाइफस्टाइल आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डेटा-आधारित कृतीशील उपायांची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, फक्त डेटा गोळा करून उपयोग नाही, तर त्यावर आधारित योग्य जीवनशैली बदल आवश्यक आहेत.

निहिलेंट चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष एल सी सिंग   यांनी मानवी भावना, विचारप्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांच्यातील संबंध स्पष्ट करताना AI ला मानवी भावनांची पूर्ण समज नसल्याचे सांगितले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp