Pune | Mon, 06 April 2026

Ad

हातमाग वारशावर आधारित फॅशन शो नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उत्साहात संपन्न

Sunil Goyal | 11 views
हातमाग वारशावर आधारित फॅशन शो नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उत्साहात संपन्न

नवी दिल्ली, दि. २१ : महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणारा फॅशन शो ‘रंग-रेषा : थ्रेड्स ऑफ महाराष्ट्र, कलर्स ऑफ इंडिया’ आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे उत्साहात संपन्न झाला.

विकास आयुक्त (हातमाग), महाराष्ट्र सदन आयोजित चार दिवसीय हातमाग साडी प्रदर्शनाअंतर्गत या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. 

या फॅशन शोमध्ये तीन प्रमुख सादरीकरणांद्वारे महाराष्ट्राच्या वस्त्रसंस्कृतीचा आणि भारतीय कलात्मकतेचे अनोखे सादरीकण झाले. ट्रायबल टू मॉडर्न आर्ट – एक भारत श्रेष्ठ भारत”  भारतीय कलाशैलींनी प्रेरित हस्तचित्रांकित हातमाग साड्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्राईड ऑफ महाराष्ट्र” या सादरीकरणात अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि महिला अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आकर्षक रॅम्पवरून घडविण्यात आले. तसेच फ्रॉम द विव्हर्स ऑफ महाराष्ट्र” अंतर्गत पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी आदी पारंपरिक साड्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले.

‘शिखाज् कारागिरी’ ब्रँडच्या हस्तचित्रांकित संग्रहाचे विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. या फॅशन शोची संकल्पना प्रसिद्ध कलाकार शिखा अजमेरा यांची असून, दिग्दर्शन सेलिब्रिटी फॅशन डिझायनर संदेश नवलखा यांनी केले.

या उपक्रमातून विणकर, कारागीर आणि पारंपरिक वस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा हा उपक्रम ठरला आहे.

********

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली–वृत्त विशेष – 81/ दि.21.3.2026

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp