Pune | Thu, 16 April 2026

Ad

जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाचे ब्रँडिंग करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 3 views
जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाचे ब्रँडिंग करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.१५: महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन स्थळांची देश-विदेशात व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी पर्यटन विभागाने सर्वसमावेशक ‘ब्रँडिंग आणि मार्केटिंग प्लॅन’ तयार केला आहे यामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे ब्रँडींग होणार आहे.  हा आराखडा अधिक सर्वसमावेशक करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृहात पर्यटन विभागाच्या मीडिया प्लॅनसंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन विभागाचे सहसंचालक संतोष जाधव यावेळी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई  म्हणाले की, “राज्यातील ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, समुद्रकिनारे, तीर्थक्षेत्र, आरोग्य, जंगले व प्रसिध्द ठिकाणे, हंगामी पर्यटन, खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती अशा प्रत्येक घटकातील पर्यटन स्थळांची माहिती आधुनिक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  ब्रँडिग करण्यात यावे. यासाठी  डिजिटल मीडिया, वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांचा प्रभावी वापर करून पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे या दृष्टीने प्रसत्न करण्यात यावेत. या मीडिया प्लॅनमध्ये  पर्यटन विभागामार्फत  २०२६-२७ या आर्थिक वर्षात नियोजित असलेल्या तरतुदीतून जागतिक, आंतरराज्य व राज्यात पर्यटन विभागाचा सर्वसमावेशक आराखडा तयार आहे त्याची प्रसिध्दी सर्व माध्यमातून करावी. आगामी वर्षाचा प्लॅन हा देखील तयार करावा असे निर्देश पर्यटन मंत्री देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे / विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp