Pune | Sun, 05 April 2026

Ad

जिल्हा परिषदेच्या ई -गव्हर्नन्स व सेवाकर्मी उपक्रमांची राज्यस्तरावर दखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव

Sunil Goyal | 11 views
जिल्हा परिषदेच्या ई -गव्हर्नन्स व सेवाकर्मी उपक्रमांची राज्यस्तरावर दखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव

नागपूर दि. 28– शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत आणि सेवाकर्मी कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेणे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत डिजिटल, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल केली आहे.

या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदने Website Compliance, Aaple Sarkar, e-Office, Dashboard, WhatsApp Chatbot, AI/Blockchain आणि GIS या निकषांवर प्रभावी कामगिरी केली.

तसेच “सेवाकर्मी” उपक्रमांतर्गत आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, अद्ययावत ज्येष्ठता सूची, पदोन्नतीनुसार नियुक्ती स्थिती, सरळसेवा रिक्त पदे, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टल नोंदणी व प्रशिक्षण, तसेच सेवापुस्तक अद्ययावतीकरण या महत्त्वपूर्ण बाबींमध्येही उल्लेखनीय प्रगती साधण्यात आली.

या सर्व उपक्रमांमुळे जिल्हा परिषद मार्फत तंत्रज्ञानाधारित, शिस्तबद्ध, उत्तरदायी आणि परिणामकारक प्रशासन अधिक सक्षम झाले आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितले की, “ई-गव्हर्नन्स आणि सेवाकर्मी सुधारणा या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर सातत्याने भर राहील.” असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp