Pune | Mon, 13 April 2026

Ad

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यदर्शन तर दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sunil Goyal | 1 views
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यदर्शन तर दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, दि. १२ एप्रिल — ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे आज मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालय येथे दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवाचे उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कासा ग्रॅंडे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांना अंतिम दर्शन घेता येणार आहे.

त्यानंतर दुपारी ४.०० वाजता कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी, प. पू. जांभेकर महाराज पथ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp