Pune | Fri, 24 July 2026

Ad

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीर, व्यवहार्य आणि शाश्वत तोडगा काढावा – उपसभापती सचिन अहिर

Sunil Goyal | 1 views
लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीर, व्यवहार्य आणि शाश्वत तोडगा काढावा – उपसभापती सचिन अहिर

मुंबई, दि. २४: लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीरदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य आणि दीर्घकालीन हित लक्षात घेऊन मसुदा तयार करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी दिले. श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी,  या आखाड्याची परंपरा आणि क्रीडा उपक्रम पुनर्विकासानंतरही अबाधित राहावेत, यासाठी शाश्वत व कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा काढण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त  किरण दिघावकर, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) प्रशांत कामत, उपसंचालक युवा सेवा शेखर बांगर, सहायक संचालक युवा सेवा अनु राणे तसेच आखाड्याचे विश्वस्त व सभासद उपस्थित होते.

उपसभापती सचिन अहिर यांनी तालीम संघासाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या व्यायामशाळा व कार्यालयाच्या जागेचा आढावा घेत पुनर्विकास प्रकल्पातील संरक्षित मोकळी जागा कायम राखून भविष्यात आखाड्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर सकारात्मक भूमिका मांडली. अंतिम भोगवटा प्रमाणपत्र व आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध जागेचा आखाडा व क्रीडा उपक्रमांसाठी उपयोग करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भर दिला. संरक्षित मोकळी जागा कोणत्याही कायमस्वरूपी बांधकामाशिवाय खेळ व आखाड्याच्या उपक्रमांसाठी राखीव ठेवण्याच्या पर्यायाचा सकारात्मक विचार करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

पुनर्विकास प्रक्रियेत तालीम संघाची सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरा अबाधित राहील, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वय आणि सहमतीच्या माध्यमातून शाश्वत तोडगा काढावा, असे निर्देश उपसभापती अहिर यांनी यावेळी दिले. पुनर्विकास प्रकल्पातील संरक्षित मोकळी जागा कायम ठेवून भविष्यात आखाड्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली.

0000

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp