Pune | Sun, 15 February 2026

Ad

मौजे केसनंद जमीन प्रकरणाबाबत १८ फेब्रुवारीपर्यंत  वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Sunil Goyal | 2 views
मौजे केसनंद जमीन प्रकरणाबाबत १८ फेब्रुवारीपर्यंत  वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १० : गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये ‘मौजे केसनंद, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे क्र. १०१, १०२ (जुना सर्व्ह क्र. १६४, १६५)’ या जमीन प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या प्रकरणावर येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानभवनात ‘मौजे केसनंद, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्ह क्र. १०१, १०२ (जुना सर्व्ह क्र. १६४, १६५)’ या जमीन प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित तांबे आणि संबंधित अधिकारी व दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सभापती प्रा. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, न्यायालयाने संबंधित बेकायदेशीर कामांना स्थगिती दिली असतानाही नव्याने बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही सभापती प्रा. शिंदे यांनी बैठकीत दिले.

०००

मोहिनी राणे/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp