Pune | Tue, 17 February 2026

Ad

मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश

Sunil Goyal | 33 views
मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश

मुंबई, दि. १० : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात कोकण किनारपट्टीवरील वादळी वाऱ्याची शक्यता आणि समुद्रातील परिस्थितीची माहिती दिली जाते.

जिल्हा प्रशासनाने ही माहिती  https://mausam.imd.gov.in/mumbai/ या संकेतस्थळावरून नियमितपणे मिळवून मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कळवावी, तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. सागरी सुरक्षितता व जीवितहानी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp