Pune | Thu, 09 April 2026

Ad

महाराष्ट्र खनिज गुंतवणूक परिषदेच्या आयोजनातून आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढ होईल – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Sunil Goyal | 1 views
महाराष्ट्र खनिज गुंतवणूक परिषदेच्या आयोजनातून आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढ होईल – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई दि. ८ : आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करताना देशातील सर्व राज्य आणि विविध देशातील प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना आमंत्रित करण्यात येईल. या क्षेत्रात असलेले अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध होण्यासाठी याचा फायदा होईल तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित होऊ शकेल, असे खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

महाराष्ट्र खनिज गुंतवणूक परिषद समन्वय समितीची बैठक खनिकर्म, गृह(ग्रामीण ), गृहनिर्माण, शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉ.भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी महासंचालक डॉ. राव, सह सचिव (खनिकर्म) लक्ष्मीकांत ढोके, संचालक डॉ. कामडे, महेश भैयसे, सहसंचालक बी. टी.यशवंते, उपनियंत्रक जी. राम, मोईलचे संचालक एम. एम. अब्दुल्ला यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये खनिकर्म क्षेत्रात उद्योग वाढ व रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे या दृष्टीने चर्चा करण्यात आली. परिषदेमध्ये या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, उद्योगांचे प्रतिनिधी होणार असून खासगी क्षेत्रातील जास्तीत जास्त गुंतवणूक खनिकर्म उद्योगात होण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

०००

किरण वाघ/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp