Pune | Sun, 12 April 2026

Ad

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

Sunil Goyal | 3 views
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

यवतमाळ, दि.११: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्रीसंजय राठोड यांनी महात्मा ज्योतिराव फुले चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी नगर परिषदेमार्फत महात्मा फुले शाळेजवळील खुल्या जागेच्या सिमेंट काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला.

या प्रसंगी खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर तसेच नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp