Pune | Wed, 18 February 2026

Ad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावर आगमन व स्वागत

Sunil Goyal | 26 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावर आगमन व स्वागत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी अमरावती विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.

 

000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp