Pune | Sun, 15 February 2026

Ad

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू

Sunil Goyal | 4 views
मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई, दि. १० : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे चारचाकी खासगी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH 03 FD’ ही नवीन नोंदणी मालिका ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. दुचाकी वाहनांसाठी असलेली MH 03 EX ही मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका लागू करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.

या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित शुल्क REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI EAST / RTO MUMBAI EAST यांच्या नावे काढलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, महाराष्ट्र शासनाच्या ८ मे २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे.

आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचनाफलकावर उपलब्ध असून, अनधिकृत व्यक्तींमार्फत होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतः कार्यालयातच अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा rto.03-mh@gov.in  या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक ०२२-२४०३६२२१ वरही माहिती मिळू शकते.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp