Pune | Fri, 20 March 2026

Ad

मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Sunil Goyal | 3 views
मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. २०: मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी ८ एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत युवांनी बजावलेली भूमिका, त्यांचे योगदान आणि समाजविकासातील सहभाग लक्षात घेऊन राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य व जिल्हास्तरावर हे पुरस्कार दिले जातात. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी भाग, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, श्रमप्रतिष्ठा, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती आणि संस्थांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येतो.

मुंबई शहर जिल्हा परिक्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि संस्थांकडून यापूर्वीही प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार २०१९-२० (१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२०), २०२०-२१ (१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२१), २०२१-२२ (१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२), २०२२-२३ (१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३), २०२३-२४ (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४) आणि २०२४-२५ (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२२) या वर्षांसाठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु, सामाजिक क्षेत्रात कार्यरत युवक, युवती व संस्थांचे प्रस्ताव अद्याप अप्राप्त आहेत. त्यामुळे नव्याने पुरस्कारांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ८ एप्रिलपर्यंत राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, दुसरा मजला, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, धारावी येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp