Pune | Sat, 04 April 2026

Ad

मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर

Sunil Goyal | 4 views
मुंबई उपनगरात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी जाहीर

मुंबई, दि. ०१  : प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून उपनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeeVvJ-mq0y4H2n_UXiF4tQiNy7UM0AdA3BbMGfZdWTY2iEQA/viewform या लिंकवर 10 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षण, पोषण व पूरक आहार, भोजन व्यवस्था, क्रीडा साहित्य व गणवेश, वैद्यकीय तपासण्या तसेच देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२६ असून निवड चाचणीची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. उमेदवारांनी निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी  पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा मार्क धरमाई – ८८९८०९०९०७. प्रीती टेमघरे – ९०२९२५०२६८, अभिजीत गुरव – ८१०८६१४९११, मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, तसेच ई-मेल: mishanlakshvedhmumsub@gmail.com यावर संपर्क साधावा. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

००००००

श्रध्दा मेश्राम/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp